facebook ani suvichar

फेसबुक आणि सुविचार–
फेसबुक आणि सुविचार ह्यांचे जुळ्या भावंडासारखे घट्ट नाते आहे.रोज कमीतकमी १०/१२ सुविचार तर सहज द्रीष्टीस पडतात.जे सुविचार माझ्या वाचनात येतात त्यावर मी नेहमीच विचार करते कि ज्या मुले माझ्या मेंदूला थोडा व्यायाम मिळेल आणि ज्ञानात चांगली भर पडेल.विचार करताना माझ्या असे लक्ष्यात येते कि ह्या सुविचारांचा वेगळ्या पद्धतीनेही विचार होऊ शकतो.या तो योग्यही असतो.त्यावेळी मी अश्या सुविचारावर माझे मत लिहिते.त्यावर सुविचार पोस्ट करणाऱ्याच्या प्रतिक्रिया खालील प्रमाणे असतात.
१.–माझ्या मतावर विचार करून तो पटला तर तसे लिहिणे.२.–काहीच प्रतिक्रिया न देणे (सुविचार लिहितानाही त्या बद्दल काहीच विचार न केल्यामुळे असे होत असावे)३.–ह्या सुविचारांचा जनक/लेखक दुसराच कोणीतरी आहे हे विसरून जाऊन तो सुविचार आपलाच आहे असे मानून त्यावरची वेगळी प्रतिक्रिया हा आपलाच अपमान आहे असे समजून नाराज होणे.
काही वेळा हे सुविचार फक्त शाब्दिक खेळ असतात…त्यात फार काही विचार नसतो.हे शाब्दिक खेळ खूप जणांना आवडतात.आणि ते पोस्ट केले जातात..परंतु ते निरर्थक किंवा कधी कधी तर विनोदाला जन्म देणारे असतात .पोस्ट लिहीणार्या व्यक्तीला तसे कंमेंट मध्ये लिहिले कि आपण नाहक त्याच्या रोषाचे धनी होतो. खूप वेळा असे होते कि लेखक त्याच्या पात्राच्या स्वभावाला धरून किंवा घटनेच्या संदर्भात काही वाक्ये लिहितो.ती त्या व्यक्तीच्या स्वभावाला किंवा घटनेला अनुरूप असतात.परंतु हा संदर्भ सोडून अशी वाक्ये सुविचार म्हणून निवडली जातात.व.पु.काळे ह्यांच्या पुस्तकातील बरीच वाक्ये अशी सुविचार समजून फेसबुक वर पोस्ट केली जातात.त्यावर विचार केला तर अशी वाक्ये प्रत्येक लागू पडू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना सुविचाराचे स्वरूप देऊ नये असे मला वाटते.एकंदरीतच फेसबुक वर सुविचार पोस्ट करणे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.खरे तर सुविचार पोस्ट करणार्याने त्या सुविचारावर स्वतःही २/४ ओली लिहाव्यात.
आता काही म्हणतील एव्हढा कसला विचार करताहात?पटकन like मारा आणि लिहिणाऱ्याला खूष करा.किंवा दुर्लक्ष्य करा.हो ..हेही मार्ग आहेत आणि फेसबुक वरची सुविचारांची संख्या पाहता तसेच करणे योग्य होईल…पण म्हणतात ना जित्याची खोड….किंवा सवयीचे गुलाम तसे काहीसे माझे झाले आहे.
—नीला शरद ठोसर–(२२/५/२०१८)

Leave a comment