maze hindi kam marathi jada–

माझे हिंदी कम,मराठी जादा.—
मी–शिवाजी मंदिरला याल का?
टाक्सी चालक आत बसायची खूण करतो.
मी-(-आत बसल्यावर )शिवाजी मंदिर च्या थोडे पुढे जायचे आहे.
टाक्सी चालक–मराठी नही समझती,माडम..,हिंदीमे बोलो.
(मनात उसळलेला सर्व राग दाबून, शिवाजी मंदिर आल्यावर)मी –आता थोडे पुढे चलो ..गाडी डावे बाजुने हळू चलाव ..दुसरी गल्ली के जवळ रुको.
तुम्हाला हसू आले न ?मलापण आले त्यावेळी ..मनात म्हटले सगळे मराठीतच बोलले मी.. तरी कळले ह्याला..आपण मात्र उगीच हिंदीत बोलतो अश्या लोकांशी.
हल्ली मुंबई मध्ये हा अनुभव नेहमीच येतो.प्लंबर ,फिटर,कारपेंटर ,कॉम्पुटर मेकानिक ,इलेक्ट्रिशिअन..असा कोणीही घरी आला आणि आपण मराठीत बोलू लागलो कि म्हणतो ,”माडमजी ,हिंदी मे बोलो हमे मराठी नही आती ..असा राग येतो मग ..१५/१५ ,२०/२० वर्षे महाराष्ट्रात राहतात ,काम धंदा करतात आणि पोटाला लावणाऱ्या या महाराष्ट्राची भाषा मात्र येत नाही…म्हणून मग मी ही युक्ती काढली आहे..आणि ती पूर्णपणे यशस्वीही होते आहे..आता ह्याचीच काही उदाहरणे वाचा..मी ह्या संवादात बोललेली हिंदी ह्यातील प्रत्येक संबधिताला कळली.
१)प्लंबर_ क्यू बुलाया बहेनजी?
मी–मेरे स्वयंपाकघरातला नळ गळता है..त्याचा वायसर बदलनेका है.
२)कार्पेंटर -अब क्या नया बनाना है बहेनजी?
मी–काही नाही..लेकीन ये खुर्ची तुम्ही बनवली आहे २ आठवडे पहले…लक्ष्यात है न?
कार्पेंतर ..हा जी..बिलकुल.क्या तकलीफ है?
मी- ये खुर्चीका balance बराबर नाही हुआ ..एक पाय थोडा कमी है..खुर्ची डगमगती है.
कार्पेंतर –कोई बात नाही,अभि ठीक कर देता हुं.
३)कॉम्पुटर मेकानिक –क्या तकलीफ है माडमजी?
मी-मी कॉम्पुटर सुरु करती हु तो आवाज येत नाही और keyboard वर “D अक्षर उठता नही .हसू येतंय ना?पण
असे बोलण्याने २ फायदे होतात.एक म्हणजे असे बोलले कि मी हिंदीत बोलते आहे असे ऐकानार्याचे समाधान होते त्याला ते समजते..(किंवा पोटासाठी तो समजून घेतो) आणि मी मराठीत बोलून त्याला मराठी शिकवते ह्याचे मला समाधान ..बघा तुम्ही हि ही युक्ती करून.
जय मराठी …जय महाराष्ट्र.!
–नीला शरद ठोसर–(१३/८/२०१८)