facebook ani suvichar

फेसबुक आणि सुविचार–
फेसबुक आणि सुविचार ह्यांचे जुळ्या भावंडासारखे घट्ट नाते आहे.रोज कमीतकमी १०/१२ सुविचार तर सहज द्रीष्टीस पडतात.जे सुविचार माझ्या वाचनात येतात त्यावर मी नेहमीच विचार करते कि ज्या मुले माझ्या मेंदूला थोडा व्यायाम मिळेल आणि ज्ञानात चांगली भर पडेल.विचार करताना माझ्या असे लक्ष्यात येते कि ह्या सुविचारांचा वेगळ्या पद्धतीनेही विचार होऊ शकतो.या तो योग्यही असतो.त्यावेळी मी अश्या सुविचारावर माझे मत लिहिते.त्यावर सुविचार पोस्ट करणाऱ्याच्या प्रतिक्रिया खालील प्रमाणे असतात.
१.–माझ्या मतावर विचार करून तो पटला तर तसे लिहिणे.२.–काहीच प्रतिक्रिया न देणे (सुविचार लिहितानाही त्या बद्दल काहीच विचार न केल्यामुळे असे होत असावे)३.–ह्या सुविचारांचा जनक/लेखक दुसराच कोणीतरी आहे हे विसरून जाऊन तो सुविचार आपलाच आहे असे मानून त्यावरची वेगळी प्रतिक्रिया हा आपलाच अपमान आहे असे समजून नाराज होणे.
काही वेळा हे सुविचार फक्त शाब्दिक खेळ असतात…त्यात फार काही विचार नसतो.हे शाब्दिक खेळ खूप जणांना आवडतात.आणि ते पोस्ट केले जातात..परंतु ते निरर्थक किंवा कधी कधी तर विनोदाला जन्म देणारे असतात .पोस्ट लिहीणार्या व्यक्तीला तसे कंमेंट मध्ये लिहिले कि आपण नाहक त्याच्या रोषाचे धनी होतो. खूप वेळा असे होते कि लेखक त्याच्या पात्राच्या स्वभावाला धरून किंवा घटनेच्या संदर्भात काही वाक्ये लिहितो.ती त्या व्यक्तीच्या स्वभावाला किंवा घटनेला अनुरूप असतात.परंतु हा संदर्भ सोडून अशी वाक्ये सुविचार म्हणून निवडली जातात.व.पु.काळे ह्यांच्या पुस्तकातील बरीच वाक्ये अशी सुविचार समजून फेसबुक वर पोस्ट केली जातात.त्यावर विचार केला तर अशी वाक्ये प्रत्येक लागू पडू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना सुविचाराचे स्वरूप देऊ नये असे मला वाटते.एकंदरीतच फेसबुक वर सुविचार पोस्ट करणे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.खरे तर सुविचार पोस्ट करणार्याने त्या सुविचारावर स्वतःही २/४ ओली लिहाव्यात.
आता काही म्हणतील एव्हढा कसला विचार करताहात?पटकन like मारा आणि लिहिणाऱ्याला खूष करा.किंवा दुर्लक्ष्य करा.हो ..हेही मार्ग आहेत आणि फेसबुक वरची सुविचारांची संख्या पाहता तसेच करणे योग्य होईल…पण म्हणतात ना जित्याची खोड….किंवा सवयीचे गुलाम तसे काहीसे माझे झाले आहे.
—नीला शरद ठोसर–(२२/५/२०१८)

vyaktivikas mhanajech deshyacha vikas.

व्यक्तिविकास म्हणजेच देशाचा विकास–
प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे.ती तिच्या जनुकाप्रमाणे काही वांशिक गुणदोष घेऊन ह्या जगात येते आणि त्याप्रमाणे तिची प्रकृती असते.परंतु त्या व्यक्तिच्या पालकांची सांपत्तिक स्थिती ,ज्ञान आणि कौशल्ये मिळवण्यासाठी तिला मिळालेल्या संधी ,ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करण्याची तिची शारीरिक आणि बौद्धिक कुवत ,घरातले आणि आजूबाजूचे वातावरण,मित्रपरिवार आणि नातेवाईक ह्यांची सांस्कृतिक पातळी,घरातील लोकांचा पाठींबा ह्या गोष्टी जनुकापेक्षाही जास्त परिणामकारक ठरू शकतात.
असे म्हणतात कि चोरी किंवा खून करणे खूप अवघड गोष्ट आहे.त्या साठी खूप बुद्धीमत्ता आणि अनेक कौशल्यांची गरज असते. कारण प्रत्यक्ष कृती करण्या आधी अनेक गोष्टींचे प्लानिंग करावे लागते.मग इतकी बुद्धीमत्ता आणि कौशल्ये असणारी व्यक्ती आपल्या क्षमतांचा उपयोग चोरी किंवा खून करण्यासाठी का करते ?ह्याचा विचार करू लागलो कि वर ज्या इतर गोष्टी सांगितल्या आहेत त्या किती जबरदस्त महत्वाच्या आहेत ते कळते.म्हणूनच एकाद्या व्यक्तीला ह्या गोष्टींपैकी किती गोष्टी आणि कोणत्या स्वरूपात प्राप्त होतील त्यावर तिचा मानसिक आणि सांस्कृतिक विकास अवलंबून असेल.दोन वेळचे पोट भरण्याची भ्रांत असलेल्या समाजाकडून उत्तम आरोग्य,उच्च शैक्षणिक आणि वैचारिक पातळी ह्यांची अपेक्षा कशी करता येईल? चांगली आर्थिक परिस्थिती,ज्ञानार्जनाच्या चांगल्या संधी,व्यक्तीची ज्ञानार्जनाची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता ,चांगला परिसर,चांगला मित्र परिवार आणि नातेवाईक,व्यक्तीला मिळाल्यास तिचा व्यक्ती विकास योग्य मार्गानेच होईल,आणि तो समाज प्रगतीला पूरक ठरेल.स्वातंत्र्य मिळाल्यापासून इतकी वर्षे उलटून गेली तरी आपला देश अजून विकसनशील देशांच्या यादीतच का आहे ह्याचे उत्तर ह्यात च मिळेल.. देशाचा विकास करू इच्छिणाऱ्या शक्तींनी कोणत्या गोष्टीना महत्व आधी द्यावयाचे हे एकदा ठरावावयास हवे.
—नीला शरद ठोसर–(१७/५/२०१८)

swavalamban

स्वावलंबन
हल्ली आर्थिक स्तर उंचावलेला असल्यामुळे आणि एकच फार तर २ मुले असल्यामुळे पालक आपल्या मुलांची जरा अतीच काळजी घेताना दिसतात.इतकेसे काही बरे नसले कि लगेच डॉक्टर कडे नेतात.शाळेत जाणाऱ्या ७/८ वि तल्या मुलाचे दप्तर स्वतः घेतात…बस असेल तर बस पर्यंत सुद्धा पालकच दप्तर घेऊन जाताना दिसतात.आमच्या वेळी पालक मुलांकडे इतके लक्ष देत नसत.
पतंगाच्या दिवसात,आम्ही घरीच पतंग बनवत असू..इतकेच नाही तर मांजा सुद्धा…त्या मांज्यासाठी काचेची पूड लागत असे.आम्ही फुटक्या बाटल्या,कप,बश्या इत्यादी काचेच्या वस्तू परसदारी नेऊन त्याची पूड करत असू…आमच्या आईवडिलांनी एकदाही त्याला मनाई केली नाही..आणि आमचेही हात कधी काचले नाहीत.हुतूतू,लंगडी,खांबखांबोल्या,आबाधोबी असे बिन खर्चाचे खेळ खेळत असू..भाऊ मात्र गोट्या पतंग आणि क्रिकेट खेळत…खेळताना खरचटले कि कुंपणाच्या कडेकडेने उगवलेल्या दगडी च्या वेलाची पाने कुस्करून खरचटल्यावर लावत असू…इतके थंडगार वाटायचे ना..’जखम कधीही पिकली नाही.उन्हाळ्यात भाड्याने सायकल आणून मैदानावर चालवायला फार मजा यायची..तसेच नदीवर पोहायला म्हणजे डुंबायला जात असू..आईवडील कधीही नको जाऊ म्हणाले नाहीत.मामाकडे अलिबागला गेलो कि आंबे उतरवण्यासाठी झाडावर चढत असू .ती कलमी झाडे तशी बुटकी आणि विस्तारलेली असत..परंतु वडाच्या झाडाला लोम्बकळणे,सूरपारंब्या खेळणे हे तर नित्याचेच….चिंचेच्या झाडावर दगड मारूनच चिंचा काढायच्या…आधीच खाली पडलेल्या आम्ही वेचून घरात आईला द्यायचो.शेवग्याचे झाड तसे फार टणक नसते…ठिसूळच असते..परंतु आम्ही शेंड्यापर्यंत जाऊन शेंगा पाडत असू.दिवाळीत स्वतःच घरीच आकाशकंदील बनवायचो .आणि एका कोपऱ्यात किल्ला..मी आणि माझा भाऊ पायलीचा फिरता आकाशकंदील रात्री जागून बनवायचो.ती आमची च खासियत होती..ग्रीटिंग कार्ड आमच्याच हाताने काढलेल्या चित्रांची बनवलेली असत..राखी सुद्धा आम्ही घरीच बनवत असू.बागेला पाणी घालणे,ती रोज झाडणे,फांद्या कापणे शेणखत देणे डाळिंबाच्या फळांना कीड लागू नये म्हणून पिशव्या शिवून बांधणे अशी कामे रविवारी करत असू.मला आठवतंय एकदा आम्ही मोठी जागा खणून वाफे करून त्यात वाटाणे पेरले..रोज पाणी देत असू …४/५ दिवस झाले तरी पुढे काही प्रगती नाहींम्हणून खणून पहिले तर नुसती टरफले…उंदरांनी खाऊन टाकले होते सर्व वाटाणे…घरात कुत्रा पळायचाय /मांजर पाळायचंय/ससे पळायचेत/मासे पळायचेत./लव्ह बर्ड पळायचेत….. कशालाही आईवडिलांची ना नसे …अट एकच..त्यांचे सर्व आम्हीच करायला हवे……त्यामुळे निरोगी कणखर शरीर,प्राण्यावर माया करणे खिलाडू वृत्ती.चित्रकला भरतकाम विणकाम असे छंद जोपासणे आपोआप होत असे…म्हणूनच त्या काळी सुट्टीत शिबिरे नसतंच..
–नीला शरद ठोसर–(१६/५/२०१८)
ता.क–माझी मुलेही लहानपणापासून घरातील सर्व कामे करत असत.आपल्या शर्टाची बटणे तुटल्यास ती लावणे,बुटांना पोलिश करणे ,इस्त्री करणे आपले मोजे आणि रुमाल धुणे हे सर्व ती करत असत.आताही वेळ पडल्यास भूक भागेल इतपत काहीतरी बनवतातच.

THE Nude…ek vichar karayala lavanaara cinema.

The Nude –एक विचार करायला लावणारा चित्रपट.
एक आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेते ह्या विषयावर आज पर्यंत अनेक सिनेमा येऊन गेले..मग ह्या चित्रपटात वेगळे काय आहे? ?तर पैसे मिळवण्यासाठी ती जो मार्ग स्वीकारते त्यात सिनेमाचे वेगळेपण आहे.ती nude मॉडेल बनते.तिची गोष्ट सांगताना लेखकाला आणि दिगदर्शकाला मुखतः स्त्रीच्या नग्नेतेकडे पाहण्याच्या जगाच्या निरनिराळ्या द्रीष्टीकोनाविषयी भाष्य करायचे आहे.
१) सर्वप्रथम दिसतो तो तिचा नवरा..त्याला स्त्री ही फक्त उपभोग्य वस्तू वाटते.बायकोकडून तो शरीरसुख हक्काने ओरबाडून घेतोच पण बाहेरही पैसे देऊन हे सुख विकत घेतो.स्त्री कडे फक्त मादी म्हणून पाहणे हा तो पहिला रानटी द्रीष्टीकोन.
२) नवर्याच्या जाचाला कंटाळून आणि मुख्य म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी ती घर सोडून मुंबईला बहिणीकडे येते.तिच्या कडे काम मागते आणि बहीण तिला nude मॉडेल बनायला सांगते.तीही तेच काम करत असते….खोली बंद असते;कोणी आत येत नाही;मुले मुली चांगली वागतात ,बाहेर कोणाला काळात नाही..पैसे चांगले आणि ताबडतोब रोख मिळतात हे सर्व ती ऐकते..पण तिचा पाय पुढे पडत नसतो…शेवटी बहीण म्हणते “अग,हे चांगले काम आहे…ह्या मुलांचा हा अभ्यासाचा विषय असतो,पण त्यांना मॉडेल मिळत नाहीत …हे शिक्षणाचे काम आहे…असे म्हटल्यावर तिला चित्रकलेचे शिक्षण घेऊ पाहणारा आपला मुलगा दिसू लागतो आणि ती हे काम स्वीकारते.मुलांना नग्न स्त्री हा फक्त एक अभ्यासाचा विषय वाटतो.नग्न स्त्री कडे पाहताना त्यांची द्रीष्टी अभ्यासू नितळ,निर्लेप असते.हा तो दुसरा नग्नतेकडे पाहण्याचा द्रीष्टीकोन.
३)एकदा संस्कृती रक्षकांचा मोर्चा कॉलेज वर येतो.चित्रांची फाडाफाडी ,सामानाची मोडतोड केली जाते.कॉलेज चे प्राध्यापक हिला म्हणतात,”आता सर्व तुमच्यावर अवलंबून आहे.तुम्हीच ठरवा उद्या येणार कि नाही ते,”ही निश्चय पूर्वक म्हणते”मुलांचे शिक्षण झालेच पाहिजे..मी येणार..”चित्रात बद्ध झालेली नग्नता हा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याकडे तितक्याच अभ्यासू आणि निर्मल द्रीष्टीकोनातून पहिले पाहिजे.त्या नग्नतेतील सौंदर्याचा जाणीव पुर्वक स्वच्छ मानाने आस्वाद घेतला गेला पाहजे हा तो तिसरा द्रीष्टीकोन.
४) मध्यंतरानंतर M F .हुसेन साहेबांची आठवण करून देणारे मलिक साहेब दिसतात.त्यांच्याकडे ती नग्न मॉडेल चे काम करायला तयार होते..पैसे चांगले मिळतात आणि मुलाच्या पैश्याच्या वाढत्या मागणीसाठी ते तिला हवे असतात.मलिक साहेब वीणा वादन करीत असलेल्या नग्न (खरे तर आत्ममग्न ) स्त्रीचे चित्र रेखाटतात ..काही .धर्मवेड्याना त्यात सरस्वतीदेवी दिसते;त्यांच्या धर्मभावना दुखावतात.आणि ते मलिक साहेबाना धमक्या देतात..शेवटी त्यांना देश सोडून जावे लागते.चित्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जनता गळा घोटते.कलाकाराच्या चित्रवस्तुकडे दूषित नजरे पाहून कलेची बळाच्या जोरावर मुस्कटदाबी करणारा हा चौथा द्रीष्टीकोन
५) तिची बहीण आजारी पडते..कामावर का आली नाही ह्याची साधी चौकशी कोणी करीत नाही.सगळे तिला विसरतात.हे सत्य तिच्या मनाला विदीर्ण करणारी भयंकर टोचणी देते,आणि तीही आपला देह समुद्राला अर्पण
करते.तिला सतत आधार देणारा एक विद्यार्थी आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवतो.t चित्रकलेचे शिक्षण अर्धवट सोडून दुबईला पैश्या साठी नोकरी करायला गेलेला आणि आता परत आलेला मुलगा ते प्रदर्शन पाहण्यासाठी येतो.चित्रे पाहत असताना त्याची कामुक भावना बळावते.एक अतिशय सुंदर नग्न स्त्री चे चित्र पायापासून पाहताना त्याला कामुक भावना आवरता येत नाहीत.परंतु नजर चेहऱ्याकडे जाताच त्याला आईचा चेहरा रेखाटलेला दिसतो.राग अनावर होऊन तो चित्रकाराच्या थोबाडीत मारतो.नग्नतेकडे पाहण्याचा सर्वसामान्य लोकांचा द्रीष्टीकोन असाच असतो.प्रत्येकाला आपली आई बहीण सोडून इतर स्त्रिया भोगवस्तुच वाटतात हे विदारक सत्य मांडून लेखक आणि दिग्दर्शक जणूकाही समाजाच्या च थोबाडीत मारतात.आणि सिनेमा संपतो
—-नीला शरद ठोसर—(८/५/२०१८)